पनवेल : रामप्रहर वृत्त
वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून कर्नाळा पक्षी अभयारण्य व ग्रामपरिस्थितिकीय विकास समिती शिरढोण यांच्या संयुक्त विद्यमाने वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खुली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कर्नाळा किल्ला परिसर व तेथील पशु व पक्षी, वन्यजीव आणि मानव संघर्ष, पशुपक्षी वाचवा, निसर्ग सजवा, मी पाहिलेला कर्नाळा पक्षी अभयारण्य असे स्पर्धेचे विषय ठेवण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षिस वितरण बुधवारी करण्यात आले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राची अनिल म्हात्रे, द्वितीय शैलेश कोडुसकर, तृतीय विघ्नेश वाजेकर, चतृर्थ सुपर्णा वाजेकर, पंचम समृद्धी पाटील या विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक 1,111 रुपये, द्वितीय पारितोषिक 555 रुपये, तृतीय पारितोषिक 333 रुपये, चतुर्थ क्रमांक 222 रुपये व पंचम क्रमांक 222 रुपये अशी बक्षिसे देण्यात आले. या वेळी उपवनसंरक्षक वन्यजीव विभाग ठाणे डॉ. भानुदास पिंगळे, सहाय्यक वनसंरक्षक कुप्ते, कर्नाळा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, ग्रामपरिस्थितिकीय विकास समिती शिरढोण अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष सुशांत वेदक, सरपंच साधना कातकरी, ग्रामपंचायत कोअर कमिटी अध्यक्ष प्रितेश मुकादम, सदस्य दीपक पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय भोपी, मा. उपसरपंच निकिता चौधरी, रोशन घरत, भगवान मुकादम, ग्रामपरिस्थितिकी विकास समिती चिंचवण अध्यक्ष दत्तात्रेय हातमोडे उपस्थित होते.