Breaking News

कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप महायुतीच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय

  • शेकापच्या बाळाराम पाटलांचा दारुण पराभव

पनवेल ः रामप्रहर वृत्त

विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात भाजप, शिवसेना, रिपाइं, शिक्षक परिषद व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. पाटील यांचा दारूण पराभव शेकापसह महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.

या निवडणुकीत 91.02 टक्के मतदान झाले होते. मतदान झालेल्या एकूण 35,069 हजार मतांपैकी 33,450 मते वैध, तर 1619 मते अवैध ठरली. मतमोजणीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे पहिल्या पसंतीची तब्बल 20,683 मते मिळवून विजयी झाले, तर पराभूत शेकापच्या बाळाराम पाटील यांना 10,997 मतांवर समाधान मानावे लागले.

ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या विजयावर प्रतिक्रिया देताना म्हात्रे यांनी, हा विजय माझा एकट्याचा नसून मतदारसंघातील संपूर्ण शिक्षकांचा आहे. गेल्या सहा वर्षांत मी जे काम केले त्याची पोचपावती आज कोकण विभागातील शिक्षकांनी दिली आहे. 33 संघटनांचा आम्हाला पाठिंबा होता तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माझावर जो विश्वास टाकला, तो विश्वास आज सार्थकी लागला आहे, असे म्हटले.

दरम्यान, या विजयाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply