Breaking News

कर्जतमधील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्जत तालुक्यातील पाथरज जिल्हा परिषद विभागामधील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. युवा नेते किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सोमवारी (दि. 6) हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमास भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, माथेरानचे माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, युवा नेते किरण ठाकरे, संतोष कराळे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद पाटील, शक्तीकेंद्र प्रमुख, भगवान डोंगरे, माथेरान संपर्क प्रमुख संतोष कदम, रमेश अहिर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की, आज ज्यांनी ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय ते सर्व भाजपचे झाले आहेत. आता विकासाच्या योजना गावांत आणि वाड्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी तुम्हीही घ्या.
या वेळी कर्जत तालुक्यातील पाथरज जिल्हा परिषद विभागातील खोंडेवाडी, कोटिंबे, बोरवाडी, खांदन, कशेळे, डोंगरपाडा, शिलारवाडी, नागेवाडी खरबाचीवाडी, बोरवाडी, शिलारवाडी, किकवी, पिंपळपाडा येथील विविध पक्षांचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नामदेव पादीर, जानू पादीर, सुहास दरवडा, अंकुश परशु उघाडा, रेवती केवारी, मनीष सावंत, काळू हिंदोला, पांडू सांबरी, राजू पादीर, गणेश कातवरा, कृष्णा थोराड आदी भाजपत दाखल झाले. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी पक्षाची शाल देऊन स्वागत केले.
दरम्यान, या पक्षप्रवेशावेळी संतोष कदम यांची माथेरान शहर संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply