पनवेल : रामप्रहर वृत्त
चौक येथील सुधीरशेठ ठोंबरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा ओढा भाजपकडे दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या अनुषंगाने चौक विभागातील ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले. या प्रवेशामुळे उरण विधानसभा मतदारसंघात भाजप अधिक मजबूत झाला असून ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे.
महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या मुंबई येथील कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सुधीरशेठ ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाचे वरोसे येथील ज्येष्ठ शिवसैनिक मारुती तवले, वाळकू सावंत, दिलीप बेलोसे, तुळशीराम तवले, संजय लाड, धारणी युवासेना उपशाखाप्रमुख मयूर पिंगळे, मंदार पिंगळे, देवेंद्र ठोंबरे, हरीश रसाळ, विवेक ठोंबरे, प्रमोद पिंगळे, आसरे येथील पंकज पोपेटे, सचिन डुकरे, प्रकाश दिसले, विजय पोपेटे, नढाळवाडी येथील निलेश वाघे, वसंत पवार, जांभिवली येथील कल्पेश कोंडीलकर, राकेश शिंदे यांनी त्यांच्या सहकार्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजप नेते सुधीरशेठ ठोंबरे, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ, सागर ओसवाल आदी उपस्थित होते.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …