Breaking News

संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे?

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा खोचक सवाल

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकेचा बाण सोडलाय. सिंधुदुर्ग येथील सभेत बोलताना राणे यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. ते शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले की, ’संजय राऊत शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे? हेच समजत नाहीत. संजय राऊत जसे दाखवतात तसे नाहीत. लावालावीचे काम करतात त्यामुळेच त्यांचे नाव संजय राऊत आहे.’ दिल्लीत ते राष्ट्रवादीच्याच कार्यालयात असतात. त्यांना शिवसेनेविषयी कोणतीही निष्ठा नाही, प्रामाणिक नाही. ते कधी होते शिवसेनेत, काय केले पक्षासाठी, असा सवाल त्यांनी केलाय. ते बोलतात तसे नाहीत. एका खासदाराला, वृत्तपत्राच्या संपादकाला अशाप्रकारची भाषा शोभत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.

कोरोनासह विविध मुद्द्यांवर केंद्र सरकार चांगले काम करत आहेत. ओमिक्रॉन या नव्या कोरोनाच्या विषाणूसंदर्भातही विविध प्रभावी उपाययोजना केंद्राकडून राबवल्या जात आहेत. देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने चालत आहे. अधिवेशन व्यवस्थित सुरू आहे, शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले आहे, असे ते म्हणाले. हे सरकार मोदींचे सरकार आहे, ते पुढचे 25 वर्षे हलत नाही, असा दावाही राणे यांनी केला. या वेळी त्यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधला. आपल्या खात्याचा विस्तार वाढावा, खात्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

ज्यांच्यावर छापे मारले जातात ते संन्यासी होते का? सुप्रिया सुळे यांच्या नातेवाईकांवर छापेमारी झाली ती योग्यच असल्याचे मत राणे यांनी या वेळी व्यक्त केले.एसटी कर्मचारी संपावरून त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही टीका केली.

दरम्यान, सतीश सावंत कोण आहेत संचयणीत घोटाळा केला तेच ना? असे म्हणत नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्षांना टोला लगावला. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत 100 टक्के निकाल आमच्या बाजूने लागेल, असाही विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्रात काही ठिकाणी नगरपालिकेला शिवसेना, काँगेसला उमेदवार मिळत नाहीत. राज्यातल आताच सरकार चालत नाहीत. एसटी कामगारांचा प्रश्न सोडवू शकत नाहीत. राज्याचा विकास रखडलाय, असेही राणे म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 21, 22, 23 जानेवारी रोजी उद्योगाच्या अनेक योजनांच्या घोषणा केल्या जाणार आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना येणार आहेत. केरळच्या धर्तीवर सगळ्या योजना कोकणात आणणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले, मात्र रत्नागिरीत तसे नेते नाहीत, वादावाद तो रस्ता तसाच राहिला, असे राणे यांनी सांगितले.

मुंबई मनपामध्ये सत्ता बदल होईल

तीन पक्षांना निवडूक नको… आजच मरण उद्यावर ढकलण्याचे काम सुरू आहे. मुंबई मनपामध्ये दिसेल असे काम करू, असे राणे म्हणाले. मला 55 वर्षे राजकारणात झाली. त्यामुळे मुंबई मनपामध्ये सत्ता बदल होईल, मात्र मनपासंदर्भात प्लॅन सांगून सुरुंग लावायचे नाही त्यामुळे सांगणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply