Breaking News

नवी मुंबई ते मुंबई हावरक्रॉप्ट सेवा जूनपासून; सिडकोकडून सर्वेक्षण सुरू

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कामगारांच्या अंतर्गत वादामुळे 20 वर्षांपूर्वी बंद पडलेली वाशी व बेलापूर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंतची हावरक्रॉप्ट सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सिडकोच्या वतीने सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. 1998 मध्ये सुरू झालेली ही सेवा त्या वेळी मुंबई-नवी मुंबईदरम्यान प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्र होते. जवळपास 180 रुपये तिकीटदर असलेल्या या सेवेमुळे प्रवासी 22 मिनिटांत मुंबईत जात होते. एपीएमसीचे व्यापारी व शासकीय अधिकार्‍यांना या सेवेचा चांगला फायदा होत होता. त्यामुळे ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. याशिवाय नेरूळ ते भाऊच्या धक्यापर्यंत जलवाहतूक करण्यासाठी जेट्टी उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. याच वेळी 20 ते 22 प्रवाशांना सामावून घेणारी हावरक्रॉप्ट सेवा सुरू करण्याचा निर्णय सिडको प्रसासनाने घेतला असून वाशी येथे या सेवेसाठी टर्मिनल्स उभारण्यात आलेले आहे, पण त्याची दुरवस्था झालेली आहे. ही सेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सर्वेक्षणाचे काम दिले असून पायाभूत सुविधांच्या निर्मितीनंतर सिडको ही सेवा पुन्हा सुरू करणार आहे. त्यासाठी पुढील वर्षी जून महिन्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. सर्वप्रथम वाशी टर्मिनल्सवरून सुरू होणारी ही सेवा नंतर प्रतिसाद लक्षात घेऊन बेलापूरहून सुरू करण्यात येणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply