पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीतून व विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या प्रयत्नांतून 25,15 इतर ग्रामविकास कार्यक्रम सन 2022-23 लेखाशिर्ष अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण हे काम मंजूर झाले आहे. त्यानुसार ज्ञानेश्वर माऊली सोसायटी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
रस्ते काँक्रीटीकरण कामाच्या भूमिपूजनावेळी विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद भिंगारकर, सदस्य भाई भोईर, किशोर सुरते, अनिल भोईर, अनंता गायकवाड, अनुसुचिता जाती मोर्चाचे अध्यक्ष अविनाश गायकवाड, डि. के. भोईर, चेतन सुरते, चेतन भिंगारकर, आनंद गोंधळी, प्रेम भिंगारकर, संजित भिंगारकर, सुनील पाटील, वनीता मांजरेकर, आनिता जगदाळे, कविता बनसुडे, ममता सातपुते, पुजा पांडूले, वसंत केलसकर, गणेश सावंत, विजय रामबहाडेख् नवले काका, जतार, बबन जाधव, धनु करदाले, प्रदीप धोत्रे, शेलके, मनोज पवार, कलसेकर आदी उपस्थित होते.
Check Also
गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …
RamPrahar – The Panvel Daily Paper