Breaking News

कोरोनाचे सर्व उपचार मोफत झाले पाहिजेत : प्रवीण दरेकर

रत्नागिरी : प्रतिनिधी
भाजप महाराष्ट्रातील जनतेसोबत आहे. त्यामुळेच राज्यात काही समाधानकारक स्थिती नसल्याने आम्ही जनतेकरिता आता उपापयोजना, आवश्यक तिथे निधी देत आहोत. भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी 50 लाखांचा निधी पनवेलच्या रुग्णालयाकरिता दिला. आमचे सर्व आमदार आपला निधी कोरोना लढ्यासाठी देत आहेत. स्वॅब तपासणी व कोरोनाचे सर्व उपचार मोफत झाले पाहिजेत. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेतून हे सर्व उपचार मोफत व्हावेत, अशी आमची मागणी असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी बुधवारी (दि. 20) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप आमदारांचे शिष्टमंडळ कोकण दौर्‍यावर आहे. हे शिष्टमंडळ रत्नागिरी जिल्ह्यात आले असता, त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. मंत्रालयापासून तालुक्यापर्यंत प्रशासनाशी समन्वय नसल्यानेच ठाकरे सरकार अपयशी ठरत असल्याची टीका या वेळी दरेकर यांनी केली.
पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री तथा भाजपचे कोकण प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण, आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, भाई गिरकर, रविशेठ पाटील, निरंजन डावखरे, माजी आमदार जठार, भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन आदी उपस्थित होते.
ज्या शिवसेनेला कोकणाने भरभरून दिले त्या कोकणात शिवसेनेने मात्र मच्छीमार, आंबा, काजू, सुपारी, नारळ बागायतदारांना वार्‍यावर सोडले. उद्योगांना कोणतेही पाठबळ नाही, पण आपले अपयश झाकण्यासाठी ठाकरे सरकार भाजपवर आरोप करीत आहे, असे दरेकर म्हणाले. 

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply