Breaking News

नागोठणे ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता येणार -आमदार प्रशांत ठाकूर

अनेकांचा पक्षप्रवेश

नागोठणे : प्रतिनिधी
येणार्‍या काळात नागोठणे ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता येईल व त्यासाठी लागणारी सर्व मदत पक्षाकडून केली जाईल, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते रविवारी (दि. 26) नागोठणे येथे आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलत होेते.
नागोठण्यातील भाजप कार्यालय येथील पटांगणात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, मिलिंद पाटील, उपाध्यक्ष राजेश मपारा, श्रेया कुंटे, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, सरचिटणीस आनंद लाड, महेश ठाकूर, निमेश वाघमारे, नागोठणे शहराध्यक्ष सचिन मोदी, शीतल नांगरे, गौतम जैन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी नागोठण्यातील प्रसिद्ध डॉ. रोहिदास शेळके, डॉ. अमिता अग्रवाल मोदी, सुनिता अभय वढावकर, अंजली सावंत, अ‍ॅड. जाधव, व्यापारी अंकुश अग्रवाल, संजय सिंग, सुधा सिंग, पाटणसईचे तरुण सागर राऊत, बाळसईचे शेखर कोकाटे, महेंद्र लहाने, हेमंत लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय चणेरे विभागातील शेकडो कार्यकर्तेही दाखल झाले. यामध्ये अतुल पाटील, मोतीराम म्हात्रे, भारत खाडे, राजन ओळंबे, संतोष ठाकूर, नितीन भोपी आदींचा समावेश होता.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात आलेल्या सर्वांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आज नागोठण्यात विविध क्षेत्रांतील मान्यवर भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांमुळे सामान्य जनतेचा विकास होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना प्रभावीपणे राबवित आहेत. त्यामुळे सामान्य जनता भाजपकडे आकर्षित होत आहे. जलजीवन मिशनद्वारे संपूर्ण रायगड जिल्ह्यात घराघरांमध्ये नळाद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार आहे. रायगडचे खासदार फक्त केंद्राने केलेल्या कामांचे श्रेय घेत आहेत.
सचिन मोदी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचे शहराध्यक्ष या नात्याने स्वागत करून येणार्‍या काळात पक्षप्रवेशाची ही मालिका अखंडपणे चालू राहील, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद लाड, अहिरे व उमाळे, शेखर गोळे, ज्ञानेश्वर शिर्के, तीरत पोलसानी व सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

’जनता भाजपला संधी देईल’
स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी नागोठण्यामध्ये भरपूर विकासनिधी उपलब्ध करून दिला आहे, हे विरोधकदेखील नाकारू शकत नाही. त्यामुळे निश्चितच येणार्‍या नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकीत जनता भाजपला संधी देईल याची आम्हाला खात्री आहे, असे या वेळी भाजप शहराध्यक्ष सचिन मोदी व जिल्हा उपाध्यक्ष श्रेया कुंटे यांनी सांगितले.

नागोठण्यात भाजप चांगल्या प्रकारे काम करीत आहे. शहराध्यक्ष सचिन मोदीही जनतेचे विविध प्रश्न योग्य तर्‍हेने हाताळत आहेत. त्यामुळेच मी भाजपमध्ये सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी प्रवेश केला आहे.
-डॉ. अमिता अग्रवाल, पक्षप्रवेशकर्त्या

 

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply