Saturday , March 25 2023
Breaking News

क्रिकेट स्पर्धेत टाटा स्टील संघ विजेता

पनवेल ः रामप्रहर वृत्त
इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ खोपोली (आयएके) आणि टाटा स्टील यांनी इंटर-इंडस्ट्री क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये खोपोलीमधील विविध कंपन्यांच्या 16 संघांनी भाग घेतला. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत टाटा स्टील संघाने विजेतेपद पटकाविले.
टाटा स्टील टाऊनशिपच्या क्रिकेट मैदानावर स्पर्धा खेळली गेली. अशा प्रकारचा उपक्रम खोपोलीमध्ये होण्याची ही पहिलीच वेळ होती. जिल्हा औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक अंकुश खराडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी आयएकेचे अध्यक्ष अविनाश सोमवंशी, टाटा स्टीलचे चीफ सीआरएम ऑपरेशन्स शशी भूषण, आयएकेचे सचिव विजय चुरी, कोषाध्यक्ष शशिकांत शेट्टी, टाटा स्टीलचे सीएसआर विभागाचे व्यवस्थापक भावेश रावल, क्रीडा समितीचे अध्यक्ष आणि सुरक्षा विभागाचे प्रमुख मनजीत धीमन प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
स्पर्धेत टाटा स्टील, पारख ग्रुप, वॉर्टसिला, मेक, सानयो स्पेशल स्टील, ओरिकॉन एंटरप्राइज, मेलिका (जारा पर्सनल केयर), एफएएल अल्लाना, एएके ऑइल, इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज, कोपर, फायबर फॉइल्स, जेएसडब्ल्यू कोटेड प्रॉडक्ट लिमिटेड, अल्टा लॅब, एचपी अ‍ॅडहेसिव्ह लिमिटेड आणि न्यूएज फायर प्रोटेक्शन इंड प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे संघ सहभागी झाले होते. यामध्ये टाटा स्टील संघाने बाजी मारली.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply