Breaking News

वीर वाजेकरला बेस्ट कॉलेज अ‍ॅवॉर्ड प्रदान

उरण ः प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयास मुंबई विद्यापीठाचा बेस्ट कॉलेज अ‍ॅर्वार्ड 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी मा. कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या या ग्रामीण भागातील महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार मिळवून दिल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे यांचा मुंबई येथे विशेष सत्कार केला, तसेच महाविद्यालय विकास समितीच्या सर्व सदस्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल

त्यांचे कौतुक केले.

प्राचार्य डॉ. सांगळे यांनी यापूर्वीही वीर वाजेकर महाविद्यालयास रयत शिक्षण संस्थेचा मानाचा कर्मवीर पुरस्कार प्राप्त करून दिला आहे. प्राचार्य डॉ. सांगळे यांनी उरण व महालण परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी प्राप्त व्हावी म्हणून व्यावसायाभिमुख कोर्सेस सुरू केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण घेण्यास खूप अडचणी येत असत. विद्यार्थ्यांची ही गरज लक्षात घेत प्राचार्य डॉ. सांगळे यांनी एमए, एमकॉम व एमएस्सी या विद्याशाखा सुरू केल्या.

महाविद्यालय इमारतीचा विस्तार करून सुसज्ज व आधुनिक प्रयोगशाळा निर्माण केल्या. आज महाविद्यालय उरणच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करतेय. मुंबई विद्यापीठाचा बेस्ट कॉलेज अ‍ॅवॉर्ड ही त्याची पोचपावती आहे. महाविद्यालयाच्या विकासासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह महाविद्यालय विकास समितीचे सर्व आजी-माजी सदस्य तसेच महालण विभागातील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. या वेळी रयतचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, नवी मुंबई परिसरात या महाविद्यालयास चांगले दिवस येणार आहेत. जेएनपीटीचे आंतरराष्ट्रीय बंदर महाविद्यालय परिसरात आहे. महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध आहोत. महाविद्यालयाच्या विकासासाठी नवनवीन कल्पना, शिफारशी मला सांगाव्यात, असेही शरद पवार यांनी नमूद केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply