नराधम बापाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पेण : प्रतिनिधी
पेणमधील तरणखोप येथील अल्पवयीन मुलीवर तिच्याच बापाने जबरदस्ती संबंध ठेवून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नराधम बापास पेण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रा.तरणखोप साईसंदेश हॉटेलच्या बाजूला ता.पेण ही आरोपी रा.तरणखोप साईसंदेश हॉटेलच्या बाजूला पेण याची स्वत:ची मुलगी असुन ती अल्पवयीन असल्याचे माहित असुनही आरोपी याने जानेवारी 2021 ते 2 मार्च 2023 या काळात तिला मारहाण करुन तिच्यासोबत जबरदस्तीने वेळोवेळी शरीसंबंध केले आहेत तसेच याबाबत फिर्यादी हीने कोणाला काहीएक सांगु नये म्हणुन तीला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी हिने पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पेण पोलिसांनी आरोपी नराधम बापास गुरवार दिनांक 2 मार्च रोजी रात्रौ 8 : 30 च्या सुमारास अटक करून बेड्या ठोकल्या. याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. 59 /2023 भा.दं.वि.कलम 376,376 (2),(एन),323,506 बाल लै.अत्या. संरक्षण (पॉस्को) अधिनियम, 2012 चे कलम 4, 5(जे)(2),2(आय)6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती माधुरी घाडगे ह्या करीत आहेत. या आरोपीस पेण न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 8 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.