Breaking News

कोकणवासियांसाठी होळीसाठी स्पेशल ट्रेन

मध्य रेल्वेकडून 12 गाड्यांची सोय : ‘सीएसटी’वरुन सर्व गाड्या सुटणार

रोहे : प्रतिनिधी

कोकणवाशियांचा महत्वाचा सण म्हणून शिमगोत्सव कडे पाहीले जाते. या शिमगोत्सवासाठी कोकणवासीय मोठ्या प्रमाणात आपल्या गावी जात असतात. त्यांना सुलभ प्रवास व्हावा या दृष्टीकोनातून होळी उत्सवा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / पनवेल आणि सावंतवाडी रोड / रत्नागिरी दरम्यान अतिरिक्त 12 विशेष गाड्या चालवणार आहे.याचा लाभ कोकणवासीयांना होणार आहे. मध्य रेल्वेकडून 12 अतिरिक्त होळी सणा निमित्ताने चालविण्यात येणार्‍या गाडयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – रत्नागिरी विशेष (3 सेवा) 01151 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. 4.3.2023 आणि 07.3.2023 रोजी 00.30 वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी 09.00 वाजता पोहोचेल. 01152 विशेष रत्नागिरी येथून दि. 6.3.2023 रोजी 06.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी 13.50 वाजता पोहोचेल. यासाठी  दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड हे थांबे देण्यात आले आहेत.पनवेल – रत्नागिरी विशेष (4 सेवा) 01153 विशेष गाडी दि. 5.3.2023 आणि 8.3.2023 रोजी पनवेल येथून 18.20 वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसर्‍या दिवशी 00.20 वाजता पोहोचेल. 01154 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. 4.3.2023 आणि 7.3.2023 रोजी सकाळी 10.00 वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी 16.20 वाजता पोहोचेल. या गाडीसाठी थांबे: रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड.हे देण्यात आले आहेतपनवेल – सावंतवाडी रोड विशेष (4 सेवा)01155 विशेष गाडी पनवेल येथून दि. 4.3.2023 आणि 7.3.2023 रोजी 18.20 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 04.10 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. 01156 विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दि. 5.3.2023 आणि 8.3.2023 रोजी 07.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 17.20 वाजता पनवेल येथे पोहोचेल. यासाठी रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ. हे थांबे देण्यात आले आहेत.रत्नागिरी- लोकमान्य टिळक टर्मिनस वन वे विशेष 01158 स्पेशल रत्नागिरी येथून 9.3.2023 रोजी 06.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 13.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.या गाडीसाठी संगमेश्वर रोड, अरावली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि ठाणे. हे थांबे देण्यात आले आहेत.

विशेष गाड्यांची संरचना

18 शयनयान, 2 सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन ठेवण्यात आले आहे. या गाड्यांच्या आरक्षणासाठी  सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि ुुु.ळीलींल.ले.ळप या संकेतस्थळावर या विशेष गाड्यांचे बुकिंग तात्काळ उघडण्यात आले आहे. थांब्यांच्या वेळेच्या तपशीलासाठी कृपयाwww.enquiry.indianrail.gov.in  ला भेट द्या किंवा छढएड अ‍ॅप डाउनलोड करावे अशी माहीती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मध्य रेल्वे जनसंपर्क विभाग यांच्यावतीने देण्यात आली आहे.

Check Also

उरणमधील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखोंचा गैरव्यवहार करणार्‍या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

उरण : प्रतिनिधीउरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखों रुपयांचा अपहारप्रकरणी ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांच्याविरोधात उरण …

Leave a Reply