Breaking News

पनवेल येथे रस्ते दुभाजकांमध्ये माती टाकण्यास सुरुवात

भाजप नेते रावसाहेब खरात यांचा यशस्वी पाठपुरावा

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल शहरातील रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये झाडे लावण्यासाठी माती टाकण्यात आली आहे. या कामी भाजप अनुसूचित मोर्चा पनवेल तालुका उपाध्यक्ष रावसाहेब खरात यांनी पनवेल महापालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. पनवेल शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्यापासून ते पुर्वेस असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोरील सर्कलपर्यंत तसेच पश्चिमेस बस थांबा क्र. 50 पासून ते पनवेल रेल्वे स्टेशनपर्यंत तसेच नवनाथ नगरपासून तक्यापर्यंत पनवेल महापालिकेने सिमेंटचे रस्ते व मध्ये दुभाजक (डिव्हाडर) चांगल्यातर्हेने बनविलेत, परंतु त्या दुभाजकामध्ये माती टाकून झाडे न लावल्याचे रावसाहेब खरात यांच्या निदर्शनात आले. त्यांनी भाजप अनुसूचित जाती मोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अ‍ॅड. प्रकाश बिनेदार  यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महापालिकेला त्या दुभाजकामध्ये माती टाकून झाडे लावण्यासाठी मागणी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. यामध्ये भाजप उत्तर रायगड जिल्हा झोपडपट्टी सेल संयोजक राहुल वाहुळकर यांचे ही सहकार्य लाभले.  रावसाहेब खरात यांच्या या मागणीची दखल घेत पनवेल महानगरपालिकेने दुभाजकात माती टाकण्यास सुरुवात केली आहे

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply