पनवेल : प्रतिनिधी
पनवेल वाहतूक शाखेतर्फे सोमवारी (दि. 13) राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 53 जणांवर कारवाई करण्यात येऊन 23 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला. ही विशेष मोहीम वाहतूक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. पनवेलच्या वाहतूक शाखेतर्फे सोमवारी कोळखे गाव (जुना मुंबई पुणे हायवे) येथे सायंकाळी 5.30 ते 7 वाजेपर्यंत पनवेल वाहतूक शाखेतील ब्लॅक स्पॉटवर विविध कलमाखाली मोटर वाहन कायद्यानुसार एकूण 53 जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये विना हेल्मेट, ब्लॅक फिल्म, फॅन्सी नम्बर प्लेट, सीट बेल्ट, कलम 185 नुसार 01 कारवाई अशा कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत एकूण 23,700 रुपये अनपेड दंडाची वसुली करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय नाळे, उप निरीक्षक खांडेकर, उपनिरीक्षक जाधव, अंमलदार आंधळे, निकम, वणवे व भोईर यांनी केली.