
पनवेल : भारतीय जनता युवा मोर्चा शहर अध्यक्षपदी रोहित रवींद्र जगताप यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे आणि मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली व आभार मानले. या वेळी शहर सरचिटणीस अमरिश मोकल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, अभिषेक पटवर्धन, अभिषेक मालोतकर, कुणाल शर्मा, अजित सिंग, राकेश अगज, दीपक महाजन, प्रथमेश धनवडे आदी उपस्थित होते.