Saturday , March 25 2023
Breaking News

भाजप नेते एकनाथ देशेकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा

पनवेल : रामप्रहर
भाजप रा. जि. ओबीसी संघटन अध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एकनाथ देशेकर यांचा वाढदिवस रविवारी (दि. 19) विविध उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. एकनाथ देशेकर यांनी वाढदिवसानिमित माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भानघर येथील करूणेश्वर वृद्धाश्रमात फळे व कपड्यांचे वाटप केले.या वेळी सरपंच कमलाताई देशेकर, माजी संरपंच शांताराम पोपेटा, माजी उपसरपंच मंगेश पाटील, रोशन पोपेटा, रवींद्र पाटील, सागर देशेकर, चंद्रकांत देशेकर, गणपत देशेकर, विश्वास म्हात्रे, धनाजी म्हात्रे, संतोष ढोरे आदी उपस्थित होते.दरम्यान, करुणेश्वर आश्रम भानघर येथे वस्तू वाटप उपक्रमासह, शांतीवन आश्रम येथे कपडे वाटप, आनंद आश्रम वाकडी येथे वस्तू वाटप इत्यादी उपक्रमही एकनाथ देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी आयोजित करण्यात
आले होते.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply