Breaking News

मोखाड्यात शनिवारी लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालय नूतन इमारत उदघाटन व नामकरण समारंभ

‘रयत’चे अध्यक्ष खासदार शरद पवार, मंत्री रवींद्र चव्हाण, चेअरमन डॉ. अनिल पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील आदी मान्यवरांची लाभणार उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे, दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे बांधण्यात आलेल्या महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नामकरण समारंभ शनिवारी (दि. 8 एप्रिल) सकाळी 9. 30 वाजता होणार आहे.
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरद पवार, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दिलीप वळसे-पाटील यांची उपस्थिती लाभणार असून अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील असणार आहेत. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आमदार सुनील भुसारा, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मधुकर भावे, संस्थेचे व्हाईस चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, रायगड विभागीय अध्यक्ष बाळाराम पाटील, पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, मोखाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अमोल पाटील, पंचायत समितीचे सभापती भास्कर थेतले, लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. भोर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply