कर्जत ः प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (दि. 22) नेरळजवळील सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्रात भेट देणार आहेत. कृषीरत्न शेतकरी शेखर भडसावळे यांच्या जल, कृषी आणि पर्यावरणविषयक प्रकल्पांची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत. त्याचवेळी सगुणा रुरल फाऊंडेशनकडून आयोजित सगुणा राईस टेक्निक (एसआरटी) पद्धतीने शेती करणार्या राज्यातील 30 शेतकर्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सन्मान होणार आहे.
या सोहळ्याला राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह देवगिरी कल्याण आश्रम (बारीपाडा, धुळे) येथील चैतराम पवार, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कृषी प्रकल्प संचालक डॉ. परिमल सिंह, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, कोकण कृषी अधीक्षक अंकुश माने प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
Check Also
दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन
अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …