Breaking News

कोरोना काळात 5300 झाडांचे संगोपन

पनवेल : वार्ताहर

कोरोना काळामध्ये झाडांचे संगोपन केले. जवळजवळ 5300 झाडांचे संगोपन खारघरमध्ये फ्युचर ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन ही संस्था करत आहे. ही झाडे या संस्थेने जुलै 2019 व 2020 मध्ये लावली आहेत. कोरोनाच्या प्रादुभाव मार्च 2020 ला सुरुवात झाल्यावर कडक लॉकडाऊन देशभरात करण्यात आले. या काळात खारघर मधील सेक्टर 9 येथील झाडांचे संगोपन कसे होईल. उन्हाळाच्या दिवसात कोण पाणी घालणार हा प्रश्न पडल्यावर फ्युचर ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन संस्था पुढे येऊन त्याचे संगोपनला सुरुवात केली. आम्ही फक्त झाडेच लावत नाहीत,तर त्या झाडांचे संगोपनदेखील करतो. खारघरमधील समविचाराच्या वृक्षप्रेमींनी एकत्र येऊन सुरवातीला ट्री पॅरेटींग या नावाने ग्रुप बनविला व फ्युचर ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन ही संस्था बनवून या संस्थेच्या माध्यमातून  झाडांचे संगोपन ही संस्था करत आहे. यामध्ये झाडांना पाणी घालणे, झाडांभोवतालचे गवत काढणे, आळी करणे, काठ्यांचा आधार देणे, खत घालणे इत्यादी कामे करून आजपर्यंत खारघर मधील 9 मैदानावरील 5300 झाडे यशस्वीपणे जगविली आहेत.  या कामामध्ये डॉ. स्वामींनाथ ढवळे, प्रकाश पालकर, प्रोफेसर सचिन देशपांडे, पियुष मलिक, गजराज, संभाजी देवकर या सर्वांचा झाडांचे संगोपन करण्यासाठी खूप मोलाचा वाटा आहे. झाडांचे महत्त्व सर्वांना आता पटत असून ऑक्सिजन किती महत्त्वाचा आहे हे सर्वांच्या लक्षात आले आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply