Breaking News

सक्षम नेतृत्व : संजय (आप्पा) ढवळे

कोणत्या घरात जन्म घ्यावा हे आपल्या हाती नसले तरीही कर्तृत्वाच्या जोरावर एखादा माणूस जीवनात कसा यशस्वी होऊ शकतो याचे चालतेबोलते उदाहरण म्हणजे भाजपचे माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे होय. संजयआप्पा यांनी कष्ट, जिद्द व दूरदृष्टीच्या जोरावर यशाची शिखरे गाठली. तळाशेत इंदापूर येथील संजयआप्पा यांचे राजकीय व सामाजिक कार्यातील योगदान महत्त्वपूर्ण आहे.

आप्पांचा जन्म 21 जानेवारी 1966 रोजी झाला. त्यांचे वडील द्वारकानाथ ढवळे हे ग्रामसेवक होते. शेती हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. आप्पांनी हलाखीच्या परिस्थितीत त्या काळात एसवायबीकॉमपर्यंतचे शिक्षण घेतले. सध्या ते आपले आईवडील व तीन भावांसह एकत्र कुटुंब पद्धतीने राहत आहेत. त्यांच्या राजकीय, सामाजिक कार्यात त्यांच्या पत्नीसह सर्वच कुटुंबाची मोलाची साथ आहे. जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी व कार्यकर्त्यांशी आप्पांचे जवळचे संबंध आहेत.

 कोणतीही संस्था, संघटना करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असते. असेच सक्षम नेतृत्व संजयआप्पा ढवळे यांच्या रूपाने माणगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाला लाभले आहे. गरिबीचे चटके आप्पांनाही बसले आहेत. त्यामुळेच ते गरीब जनतेला केंद्रबिंदू मानून काम करतात. गोरगरिबांच्या अडीअडचणी, त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड व तळमळ असते. शालेय विद्यार्थी, गरीब, गरजू व्यक्तींना मदतीचा हात देण्यास आप्पा नेहमीच प्राधान्य देतात. आपण समाजाचे देणेकरी लागतो, या भावनेने संजयआप्पा समाजासाठी योगदान देत असतात. संजयआप्पा ढवळे गेली अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीचे काम निष्ठेने व प्रामाणिकपणे करीत आहेत. 1997 साली कै. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संजयआप्पांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे अत्यंत निकटचे व विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाते. आप्पांनी विकासकामे मागायची व वरील नेत्यांनी ती द्यायची असे समीकरणच आहे. पक्षानेही त्यांना त्याचे फळ दिले आहे. त्यांना संजय गांधी निराधार योजनेचे माणगाव तालुकाध्यक्ष केले होते. या कारकिर्दीत आप्पांनी गोरगरीब जनतेला या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला. भाजपचे तालुकाध्यक्ष म्हणून आप्पांनी पहिल्यांदा माणगाव तालुक्याची धुरा हातात घेतल्यावर दोन-चार दिवसांतच पक्षाचे जनसंपर्क कार्यालय उभारले. त्याचे उद्घाटन तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले होते. पुरुष व महिला कार्यकर्त्यांना संघटित करून त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे तसेच केंद्र व राज्याच्या विविध योजना तळागाळातील जनेतपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. पक्षवाढीसाठी घेतलेली मेहनत व राबविलेले विविध उपक्रम याचा विचार करून पक्षनेतृत्वाने पुन्हा एकदा त्यांची माणगाव तालुका भाजप अध्यक्षपदी निवड केली आहे. जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून आप्पांनी अनेक वर्षे चांगल्या प्रकारे काम करून पक्षाला योगदान दिले आहे.

आप्पा सामाजिक बांधिलकी, जातीय सलोखा राखून काम करीत आहेत. वडपाले येथील ग्रामस्थांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आप्पांनी स्वखर्चाने बोअरवेल मारून दिली. विविध क्षेत्रांतील कार्यामुळे संजयआप्पांची सर्वदूर ओळख झाली आहे. संजयआप्पा ढवळे यांचा आज (दि. 21) वाढदिवस असून, त्यांना दीर्घायुष्य लाभो, हीच मनःपूर्वक प्रार्थना!

-सलीम शेख, माणगाव

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply