Breaking News

अनधिकृत शाळांमुळे प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

पनवेल : प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी पनवेल तालुक्यातील दहा शाळा अनधिकृत जाहीर केल्याने तेथील प्रवेश घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले आहे. त्यांना दुसर्‍या शाळेत प्रवेश देण्याची व फी परत मिळवून देण्याची जबाबदारी कोणाची? आपल्या पाल्याच्या भविष्याच्या चिंतेमुळे शिक्षण खात्याला एवढ्या उशिरा का जाग आली. या शाळा जाहिरात करून प्रवेश देत असताना शिक्षण खाते काय करीत होते, असे अनेक प्रश्न पालक विचारीत आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विभागाकडून जिल्ह्यातील अनधिकृत असलेल्या प्राथमिक शाळांची यादी जाहीर केली त्यामध्ये पनवेल तालुक्यातील दहा शाळांचा समावेश आहे. या शाळा शासनाच्या परवानगी विना सुरू असल्याने पालकांनी या शाळांमध्ये आपल्या पाल्यास दाखल करू नये, असे आवाहन शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांनी केले आहे. तरीही या शाळांमध्ये मंगळवारी प्रवेश सुरू असल्याचे दिसून आले आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी मंगळवारी (दि. 6 जून) अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली, पण या शाळांनी त्यापूर्वीच जाहिरात करून आपली प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. आजच्या काळात शाळेत प्रवेश मिळणे अवघड असल्याने पालकांनी ही हजारो रुपये फी भरून प्रवेश घेतले. त्या पालकांपुढे आता प्रश्न निर्माण झाला आहे काय करायचे. शिक्षण अधिकारी म्हणतात प्रवेश रद्द करा. तुम्ही त्यांच्याकडे फी परत मागा, पण शाळा फी परत देणार नाही. पुन्हा दुसरीकडे प्रवेश मिळणे अवघड आहे. त्यासाठी पुन्हा पैसे कोठून आणायचे. शाळेचे कर्मचारी सांगतात शासनातर्फे, अशी दरवर्षी अशी यादी जाहीर केली जाते. आम्हाला परवानगी नसली तरी काळजी करू नका आम्ही मुलांना अधिकृत शाळेतून परीक्षेला बसवणार आहोत. यामूळे पालकांची अवस्था मात्र द्विधा झाली आहे. त्यांना काही विचारल्यास ते बोलायला तयार नाहीत. पनवेलचे गट शिक्षण अधिकारी सीताराम मोहिते यांना अनधिकृत शाळा प्रवेश सुरू असल्याबद्दल विचारले असता आम्ही त्यांना 15 दिवसांची नोटीस देत आहोत. त्यांनी शाळा बंद करावी. कोणाला प्रवेश देऊ नये; अन्यथा 10 लाख रुपये दंड किवा फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. पालकांनीही आपल्या मुलांचा प्रवेश रद्द करून त्यांचाकडून फी परत घ्यावी; अन्यथा शाळेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असे सांगितले शाळा सुरू करण्यासाठी संस्थेने प्रथम शासनाकडे विहित नमुन्यात अर्ज करायचा असतो. त्यांनी अटी पूर्ण केल्या असल्यास त्यांना इरादा पत्र दिले जाते. ते दिल्यावर 18 महिन्यांत त्यांनी सर्व भौतिक सुविधा पूर्ण केल्यावर त्यांना शाळा सुरू करायला परवानगी दिली जाते.

पालकांनी प्रवेश घेताना शाळेबाबत चौकशी करणे गरजेचे होते. त्यांच्या पाल्यांना महापालिकेच्या व इतर शाळेत प्रवेश दिला जाईल. आम्ही गट शिक्षण अधिकार्‍यांना विना परवाना सुरू असलेल्या शाळांची यादी पाठवण्यास सांगितले होते. लगेच दुसर्‍या दिवशी अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली. उशिरा पाठवली असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. पनवेलच्या गट शिक्षण अधिकार्‍यांना ज्या शाळा अनधिकृत आहेत त्या शाळा सुरू होऊ नयेत, यासाठी केंद्र प्रमुख किवा विस्तार अधिकारी नेमून खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्यात.
-पुनीता गुरव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. रायगड

पनवेल शहरात असणार्‍या मोठ्या शाळांची फी करंजाडेमध्ये राहणार्या मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना परवडणारी नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या सोयीसाठी शाळा सुरू केली आहे. शासनाचे रजिस्ट्रेशनचे नियम कडक असल्याने आम्हाला परवानगी मिळत नाही. आमची शाळा ही प्री-प्रायमरी आहे. पण काही पालक त्यानंतर विनंती करतात म्हणून आम्ही दुसर्‍या शाळेबरोबर टायप करून त्यांना पहिली व दुसरीसाठी प्रवेश देतो. शासनाने यातून मार्ग काढला पाहिजे.
-हरिषमल, संस्था चालक, वेद गृह पब्लिक स्कूल

पनवेलमधील बेकायदा शाळा
मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल ओवे, तुळजाभवानी शिक्षण मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर, केळसेकर इंग्लिश मीडियम स्कूल तळोजा पाचनंद, अर्कम इंग्लिश स्कूल तळोजा, वेदिक ट्री प्री स्कूल करंजाडे, वेद ड्राप पब्लिक स्कूल करंजाडे, विनायक आश्रय, करंजाडे, डॉल्फिन किड्स स्कूल, करंजाडे, ओसीन ब्राईट कॉन्हेंट स्कूल तळोजा, वेदांत पब्लिक स्कूल कळंबोली, ऑक्सफोर्ड इंग्लिश स्कूल कळंबोली, सेंट अन्योनी इंग्लिश स्कूल करंजाडे, एस.जी.टी. इंटरनॅशनल स्कूल करंजाडे, वेद गृह इंटरनॅशनल स्कूल करंजाडे, ओझन्स इंटरनॅशनल स्कूल कोळखे, प्लीजन्ट इंग्लिश स्कूल सांगडे, एस. बी. पी. इंग्लिश स्कूल शेडुंग, पायोनियर पब्लिक स्कूल पारगाव, लिटल चॅम्प ओवळे, एकलव्य स्कूल ओवळे, साई गणेश एज्युकेशन सोसायटीची लाटे विनायक केशव जोशी मेमोरियल नवजीवन इंटरनॅशनल स्कूल टोल नाका आपटा फाटा, दी इंग्लिश स्कूल, उलवा, न्यू इंग्लिश स्कूल, कोपरा, रोहिंजण इंग्लिश स्कूल रोहिंजण, आकृती एज्युकेशनल अँड वेलफेअर सो. एस. एम. बी.
इंटरनॅशनल स्कूल उलवे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply