Breaking News

कर्ज परतफेडीसाठी मंदिरातील देव पळवले

रेवदंडा मंदिर चोरीप्रकणी मुद्देमालासह आरोपी जेरबंद

अलिबाग, रेवदंडा ः प्रतिनिधी
रेवदंडा येथील तीन मंदिरांमध्ये झालेल्या देवाच्या मूर्तींच्या चोरीप्रकरणी पोलिसांनी एकाला मुद्देमालासह अटक केली आहे. महेश चायनाखवा असे आरोपीचे नाव असून कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याने या चोर्‍या केल्याचे तपासात पुढे आले आहे.
18 मे रोजी रेवदंडा थेरोंडा येथील खंडेराव पाड्यातील खंडोबा मंदिरातील देवदेवतांच्या चांदीच्या मूर्ती, टाक, लोलक, आगल्याची वाडी येथील मुंबईकर कुटुंबियांच्या कुलदेवतांच्या चांदीच्या मूर्ती, टाक, एकविरा देवीचा मुखवटा, तसेच ढोलके कुटुंबियांच्या कुलदेवतांच्या मूर्ती, टाक लोलक चोरीला गेले होते. या चोरीच्या तपासासाठी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी रेवदंडा पोलिसांची दोन पथके तपासासाठी तयार केली, तसेच स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके समांतर तपास करीत होती. या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज गोळा करणे, रेखाचित्र तयार करणे, स्थानिकांकडून गोपनीय माहिती गोळा करणे, रेकॉर्डवरील आरोपी तपासणे सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करणे अशी जबाबदारी पार पाडली.
तपासादरम्यान पोलिसांना आगल्याची वाडी येथील महेश चायनाखवा याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने या तीनही ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दिलेल्या पोलीस कोठडीच्या कालावधीत आरोपीने चोरलेला एक लाख 60 हजार 800 रूपयांचा मुददेमाल हस्तगत केला. रेवदंडा पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे, उपनिरीक्षक दीपक म्हशीलकर, सहायक फौजदार अशोक पाटील, पी. डी. देसाई, कर्मचारी दिनेश पिंपळे, अस्मिता म्हात्रे, सुषमा भोईर, राकेश मेहतर, मनोज दुम्हारे, पंजाब पोळे तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील साठे, दबडे, हंबीर, लांबोटे, चव्हाण आदिंनी मेहनत घेतली.

ग्रामस्थांचेही सहकार्य

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी अगल्याची वाडी येथील नागरिकांची बैठक घेतली असता महेश चायनाखवा याच्या घरी दोन व्यक्ती मागील काही महिन्यांपासून येत असून ते पैशांची मागणी करीत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने तपास केला असता, महेश याने या दोघांकडून लग्न आणि व्यवसायाकरिता कर्ज घेतले होते. त्यासाठी ते तगादा लावत होते, अशी माहिती पुढे आली. पोलिसांनी महेशला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हा कर्ज परतफेडीसाठी चोरी केल्याची कबुली दिली.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply