पनवेल : वार्ताहर
सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गुरुवारी (दि. 8) पनवेल शहर पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी विजय कादबाने यांनी उपस्थितांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.
विजय कादबाने यांनी काही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ पोलीस ठाणे येथे माहिती द्यावी या बाबत सूचना केल्या. या वेळी शांतता कमिटीचे सदस्य जयंत पगडे, महेश साळुंखे, मुकीद काझी, पराग बालड, जवाद काझी, इम्तियाझ बेग, नावेद पटेल, मोझेस कोरलेकर, इमाउद्दीन देशमुख, प्रसाद म्हात्रे यांच्यासह गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव उपस्थित होते.
Check Also
रोटरी क्लबच्या पैठणी महोत्सवाचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने …
RamPrahar – The Panvel Daily Paper