Breaking News

नारवेल-बेनवले खारबंदिस्तीचा भाग खचला 

खारे पाणी भातशेतीत घुसले; कामाच्या चौकशीची मागणी

पेण ः प्रतिनिधी

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तालुक्यातील नारवेल-बेनवले खारबंदिस्तीचा भाग खचल्याने समुद्राचे खारे पाणी भातशेतीत घुसून नुकसान झाले आहे, तसेच आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खारबंदिस्तीच्या या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. पेण तालुक्यात नारवेल-बेनवले येथे राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प महाराष्ट्र जागतिक बँक सहाय्यता अंतर्गत 16.44 किमीच्या खारबंदिस्तचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. वारंवार या बंदिस्तीला खांडी तसेच बांध खचण्याचे प्रकार घडत आहेत. या बंदिस्तीमधील नुकतेच बहिरामकोटक येथे तडा जाऊन बंदिस्तीचा काही भाग खचून समुद्रात गेला आहे. बांधाचा इस्टीमेट बनविताना त्यासाठी लागणारी माती हा मुरूम स्वरूपात न वापरता चिखल माती वापरली जाते. यामुळे बांध खचण्याचे प्रकार घडत आहे. भविष्यात येथील नागरिकांचा मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल अशी भीती ग्रामस्थांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

अद्याप कार्यवाही नाही

याबाबत अधीक्षक अभियंता दक्षता पथक मुंबई परिमंडळ पाटबंधारे विभाग ठाणे यांची खारेपाट विकास संकल्प संघटना व क्रांतीवीर संघटना यांनी भेट घेऊन निदर्शनास आणून दिली होती, परंतु आज 15 दिवस उलटून गेले तरी कोणत्याही प्रकारची पाहणी व चौकशी झाली नसल्याचे दिसून येत आहे. पावसाळा सुरू झाला तर पाहणी करणे कठीण जाईल, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply