पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या 24 जून या स्मृतिदिनानिमित्त लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून पनवेल येथे रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 9) बैठक झाली.
आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात झालेल्या लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत रोजगार महामेळाव्याच्या नियोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. याच सभागृहात हा महामेळावा होणार असून ही बेरोजगार तरुण-तरुणींसाठी सुवर्णसंधी आहे.
या बैठकीस कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, सरचिटणीस दीपक म्हात्रे, सहचिटणीस राजेश गायकर, खजिनदार जे. डी. तांडेल, जे. एम. म्हात्रे, दशरथ भगत, भूषण पाटील, संतोष केणे, दीपक पाटील, डी.बी.पाटील, सुनील कटेकर, अतुल पाटील, रूपेश धुमाळ, सुशांत पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते.
Check Also
जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…
2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …