Breaking News

पनवेल पोलीस पाटील अध्यक्षपदी मिलिंद पोपेटा

पनवेल : वार्ताहर

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्य सचिव कमळाकर मांगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पनवेल पोलीस पाटील अध्यक्ष निवड करताना सर्वानुमते मिलिंद जोमा पोपेटा (पो. पा. शिवकर, पनवेल ) यांची निवड करण्यात आली.

तसेच पनवेल तालुका उपाध्यक्षपदी संतोष गायकर (पो.पा. भिंगारवाडी), पनवेल तालुका सचिवपदी कुणाल लोंढे (पो.पा.करंजाडे), पनवेल तालुका सहसचिवपदी स्मिता म्हात्रे (पो.पा.वावंजे), पनवेल तालुका खजिनदारपदी प्रमोद नाईक (पो.पा.पारगाव डुंगी) यांची निवड करण्यात आली आहे.

हा कार्यक्रम पनवेलच्या शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे रायगड जिल्हा अध्यक्ष हरिश्चंद्र दुदुसकर यांच्यासह रायगडातील विविध पोलीस पाटील यामध्ये खालापूरचे दिनेश पाटील, कुंडेव्हाळच्या मिनाक्षी पाटील, सांगुर्लीच्या सुगंधा पारधी, नांदगावचे विजय खुटले, तुरमाळेचे निलेश गायकर, पळस्पेचे एकनाथ पाटील, कसळखंडचे प्रवीण पाटील, चिंचवणचे दिलीप खुटले, कोळखेचे पांडुरंग जाधव, वडवलीचे वसंत पाटील, वहाळचे शफिक शेख, नानोशीचे संदीप ठाकरे आदींसह या कार्यक्रमाला पनवेल तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply