Breaking News

दुचाकी अपघातात मुख्याध्यापिकेचा दुर्देवी मृत्यू

पनवेल : वार्ताहर
पनवेल जवळील पळस्पे फाट्या जवळ शाळेत चाललेल्या मुख्याध्यापिकेच्या दुचाकी वाहनाला झालेल्या अपघातात त्यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 24) सकाळी घडली आहे. पनवेल येथे जिल्हा परिषदेच्या गिरवले शाळेच्या शिक्षिका ललिता ओंबळे मुख्याध्यापिका ललिता ओंबळे या शनिवारी सकाळी त्यांच्या दुचाकीवरून पळस्पेजवळील गिरवले गावात असलेल्या शाळेमध्ये जात होत्या. पळस्पे ब्रिजच्या पुढे चर्चच्या समोरील बाजूस एका अज्ञात वाहनांची धडक त्याच्या दुचाकीस बसून त्यात त्यांचा तोल गेला त्या रस्त्यावर पडल्या आणि याच या एकेरी मार्गावरून भरधाव येणार्‍या कंटेनरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून फरार वाहन चालकाचा शोध सुरू आहे.

Check Also

खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून विजयाचा निर्धार अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी …

Leave a Reply