पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी ऽ 9 कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने पनवेल विधानसभा भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 24) राज्याचे उद्योजकता व कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली लाभार्थी संमेलन उत्साहात झाले.
तक्का येथील श्री संत सावता माळी सभागृहात झालेल्या या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर सीता पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, विस्तारक अविनाश कोळी यांच्यासह माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या नऊ वर्षांच्या काळात समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी कार्य करण्यात आले. त्या अनुषंगाने भाजपतर्फे मोदी ऽ 9 कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग असलेल्या लाभार्थी संमेलनास पनवेलमध्ये प्रतिसाद लाभला. या वेळी प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन करून मोदी सरकारच्या योजनांची घरोघरी जाऊन माहिती द्यावी, असे आवाहन केले.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …