Breaking News

म्हसळा महावितरणकडे पावणेतीन कोटींची थकबाकी

विजबिल न भरल्यास कनेक्शन तोडणार; महावितरणचा इशारा

म्हसळा ः प्रतिनिधी
म्हसळा विभागातील वीज ग्राहकांनी वेळेत बिल न भरल्याने महावितरणकडे एकूण दोन कोटी 74 लाखांची थकबाकी झाली आहे. त्यामुळे थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडून केल्या जाणार्‍या कारवाईला थकबाकीदार ग्राहकांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे म्हसळा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप पटवारी यांनी सांगितले.
तालुक्यातील आंबेत, खामगाव, मेंदडी, म्हसळा शहरआणि म्हसळा या विभागातील चार हजार 194 ग्राहकांनी रुपये दोन कोटी 74 लक्ष रुपये थकविले आहेत. यामध्ये घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सरकारी कार्यालये, शेती, पथदिवे, नळ पाणीपुरवठा आणि इतर ग्राहकांचा समावेश आहे.
उपविभागाची थकबाकी घरगुती 3521 ग्राहकांची 33.71 लक्ष थकबाकी, वाणिज्य 224 ग्राहकांची 5.34 लक्ष थकबाकी, औद्योगिक 30 ग्राहकांची 96 हजार थकबाकी, शेती 113 ग्राहकांची 94 हजार थकीत, पथदिवे 121 ग्राहकांची 217.06 लक्ष थकबाकी, पाणीपुरवठा 39 ग्राहकांची 11.10 लक्ष थकबाकी, सार्वजनिक सेवा 127 ग्राहकांची 3.33 लक्ष थकबाकी, इतर 16 ग्राहकांची 1.53 लक्ष थकबाकी आहे.

कर्मचार्‍यांकडून घरोघरी आवाहन
ग्राहकाभिमुख सुविधांसाठी वीजग्राहकांनी तत्काळ थकबाकी भरून वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता प्रदीप पटवारी यांनी केले आहे. कनिष्ठ अभियंतासह स्थानिक वीज कर्मचारी घरोघरी जाऊन करीत आहेत. ग्राहकांनी लवकरात लवकर आपली थकबाकी भरावी अन्यथा वीज कनेक्शन तोडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply