माणगाव ः प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे असणार्या माणगाव बसस्थानकात गेले अनेक दिवस प्रवाशांना खड्डे व चिखलातून पायपीट करावी लागत आहे.
याबाबत युवासेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. त्यानंतर आमदार भरत गोगावले यांनी पाठपुरावा करीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून निधी उपलब्ध करून घेतला होता. बसस्थानकातील काँक्रीटीकरणासाठी 16 लाख रुपये मंजुर करुन घेतला. हा निधी अपुरा पडल्याने उर्वरित काम दुसर्या टप्यात केले जाईल, असे आश्वासन आमदार गोगावले यांनी दिले होते, मात्र उर्वरित निधी उपलब्ध झाला नसल्यामुळे बसस्थानकात खड्डे पडले असून नागरिकांना या खड्डे व पावसाळ्यातील चिखलातूनच पायपीट करावी लागत आहे.
युवासेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी सांगितले की, प्रवाशांना सर्व पायाभूत सुविधा मिळण्यासाठी शिवसेना पक्षप्रतोद आमदार भरत गोगावले यांनी निधी मंजुरीची प्रक्रिया प्रगतीपथावर असून येत्या 15 ते 20 दिवसांच्या आत निधी मंजूर होऊन निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल, असे आश्वासन दिले आहे.
Check Also
गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन
पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …