Breaking News

पनवेलमधील विचुंबेत विद्यार्थी गुणगौरव

संधीवर स्वार होऊन भवितव्य घडवा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
आलेल्या प्रत्येक संधीवर स्वार होऊन भवितव्य घडवा, असा सल्ला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. ते विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात बोलत होते.
भारतीय जनता पक्ष विचुंबे, दुर्गामाता मित्र मंडळ, मंगलमूर्ती मित्र मंडळ आणि विचुंबे ग्रामस्थांच्या वतीने दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सोमवारी (दि. 17) विचुंबे जि.प. शाळेत आयोजित करण्यात आला होता. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्यास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी जि.प. सदस्य अमित जाधव, माजी पं.स. सदस्य भूपेंद्र पाटील, विचुंबे भाजप गाव अध्यक्ष के.सी.पाटील, पाली देवद विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद भिंगारकर, मानव अधिकार समितीचे अध्यक्ष शाम पाटील, माजी सरपंच अमिता म्हात्रे, माजी उपसरपंच रवींद्र भोईर, अनुसूचित जाती मोर्चाचे पनवेल ग्रामीण विभागीय अध्यक्ष अविनाश गायकवाड, नयन भोईर, श्री. गणेश, नितीन भोईर, सतीश भिंगारकर, अनिल भोईर, शाम म्हात्रे, अक्षता गायकवाड, नावीत भोईर, चेतन भिंगारकर, प्रेम भिंगारकर, सुदर्शन गोसावी, सुनील पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन भारत घडत असून प्रत्येकासाठी नवी संधी उपलब्ध होत आहेत. या संधीचा स्वीकार करण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचे आहे.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply