Breaking News

पनवेल तक्का परिसरात गोणीतून रक्त निघत असल्याने खळबळ; माजी नगरसेवक राजू सोनी यांची तत्परतेने दखल घेत कार्यवाही

पनवेल : वार्ताहर
पनवेल जवळील तक्का परिसरात अज्ञात इसमाने टाकलेल्या गोणीत रक्त निघत असल्याने परिसरात खळबळ माजली होती. मात्र जागृत नागरिक व माजी नगरसेवक राजू सोनी यांनी तत्परतेने पनवेल शहर पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांना गोणीची तपासणी केली असता गोणीत कोंबडीच्या मासाचे तुकडे सापडल्याने नागरिकांनी सुटका निश्वास सोडला तसेच तत्परतेने कार्यवाही केल्याबद्दल माजी नगरसेवक राजू सोनी यांचे आभार मानले.
तक्का येथे बंद पडलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या रोडवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गोणी आणून रस्त्यालगत टाकली होती. व त्या गोणीतुन संपुर्ण रक्त रस्त्यावर वाहत असल्याचे स्थानिक नागरिकांना दिसून आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यावेळी काही स्थानिक नागरिकांनी याबाबत माजी नगरसेवक राजू सोनी यांना फोनद्वारे कळविले. राजू सोनी यांनी तात्काळ त्या ठिकाणी त्यांचे स्वीय सहाय्यक मंदार देसाई यांना पाठवून पाहणी करण्यास सांगितलं. तसेच याघटनेबाबत पनवेल शहर पोलिसांना सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून पनवेल शहर पोलिस गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद पवार व त्यांच्या सहकार्‍यांनी त्या गोणीची पाहणी केली असता गोणीमध्ये चिकनच्या मासाचे तुकडे आढळून आले. गोणीत चिकनचे मास असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी सुटका निश्वास सोडला. या मासामुळे परिसरात खूप दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे माजी नगरसेवक राजू सोनी यांनी घंटागाडी बोलावून संपूर्ण मासाचे तुकडे उचलून तो परिसर स्वच्छ करून घेतला. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांनी माजी नगरसेवक राजू सोनी व त्यांचे स्वीय सहाय्यक मंदार देसाई यांचे आभार मानले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply