
’मोहरा’ चित्रपटातील ’टिप टिप बरसा पानी’ या गाण्यानं तब्बल दोन दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. आजही हे गाणे सुपरहिट आहे. अक्षय आणि रवीनाचे हे गाणे पुन्हा एकदा नव्याने मोठ्या पडद्यावर रिक्रिएट केले जाणार आहे. रोहित शेट्टीच्या आगामी सूर्यवंशी चित्रपटात हे गाणे दिसणार आहे. ’टिप टिप बरसा पानी’ आणि पिवळ्या साडीतील रवीना टंडन हे समीकरण विसरणे प्रेक्षकांना शक्य नाही. मात्र, सूर्यवंशीमध्ये या गाण्यात अक्षयसोबत रवीना दिसणार नसून कटरिना कैफ दिसणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीने या गाण्याचे हक्क विकत घेतले असून तो त्याच्या चित्रपटासाठी हे गाणं नव्याने क्रिएट करणार आहे. नृत्य दिग्दर्शिका फराह खान या गाण्याची कोरिओग्राफी करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटीमध्ये या गाण्याच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात अक्षय पोलीस ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper