Breaking News

नवी मुंबईत पावसाचे धुमशान

नवी मुंबई : बातमीदार
राज्याच्या हवामान खात्याने पुढील पाच दिवसा अतिवृष्टीचा इशारा खरा ठरताना दिसत आहे. पावसानेदेखील कोकण पट्ट्याला आपला तडाखा दिला आहे. सलग तीन दिवस पाऊस कोसळत आहे. नवी मुंबईतदेखील पावसाचा फटका बसल्याचे दिसून आले. नवी मुंबईत मंगळवारी मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळाला.
या कोसळधारेने नवी मुंबईकर मात्र चिंब झालेले पाहायला मिळाले. अनेकांची त्रेधा उडालेली पाहण्यास मिळाली. नवी मुंबईची रचना एकाबाजूला खाडी, त्यापासून तीन की. मी वर डोंगररांगा अशी आहे. त्यामुळे एकाचवेळी मुसळधार कोसळत असलेला पाऊस, डोंगरावरून शहरात वाहून येत असलेले पाणी त्यामुळे शहरात सखल ठिकाणी पाणी साठले होते, मात्र उत्तम ड्रेनेज सिस्टीम असल्याने काही मिनिटांत साठलेले पाणी वाहून जाताना दिसले, मात्र काही ठिकाणी मात्र कंबरे एवढे पाणी साठलेले दिसले. मध्यरात्रीपासून क्षणभरदेखील उसंत न घेतलेल्या पावसाने नवी मुंबईला झोडपून काढले. नवी मुंबईतील शिरवणे उड्डाणपुलाखाली गुडघाभर तर व सानपाडा रेल्वे उड्डाणपूलाखाली कंबारेइतके पाणी साठल्याने या भागातून जाणार्‍यांची मात्र त्रेधा उडाली. शिरवणे गावातून जुईनगर व नेरूळ भागात जाण्यासाठी रेल्वे मार्गखाली भुयारी मार्ग आहे. हलक्या सरींमुळेदेखील येथे पाणी भरते, मात्र मुसळधार पावसाने मात्र कंबरेइतके पाणी भरल्याने बैकस्वाराना आपल्या दुचाकी तोल सांभाळत न्याव्या लागल्या. हीच परिस्थिती सानपाडा उड्डाणपुाखाली दिसून आली. प्रामुख्याने काही गावठाण भाग व तुर्भे झोपडपट्टी येथील भागाला देखील काहीसा फटका बसला. शहरात काही ठिकाणी फांद्या तुटण्याच्या व झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. आपत्कालीन, अग्निशमन, उद्यान व घनकचरा विभाग मात्र याबाबत सतर्क होता. या फांद्या तातडीने उचलण्यात येऊन रस्ते व पद्पथ मोकळे करण्यात आले.

नागरिकांकडून लहानग्यांची काळजी

शाळा बंद असल्याने शहराचे ट्राफिकची समस्या कोठेही उदभवली नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांना काहीसा दिलासा मिळाला. सर्दी, खोकला, तापाची साथ असल्याने पालकांनी मात्र मुलांना पावसात भिजण्यास मज्जाव केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मुलांचा मात्र हिरमोड झाला. काही मुलांना शाळांमधून घरी जाताना भिजण्याचा मोह आवरता आला नाही. नागरिकांमध्ये आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्कता आल्याचेदेखील दिसून आले. अनेक नागरिक शहरात विविध ठिकाणी साठलेल्या पाण्याला टाळून चालताना दिसले. वाहनांचे पाणी अंगावर उडणार नाही याची दक्षता घेत नागरिक घेत असल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे पदपथांवर साठलेले शेवाळे टाळून चालताना नागरिकांना कसरत करावी लागली

मोरबे धरणातील पाणीसाठा वाढतोय

संपूर्ण जून महिना पाऊस नसल्याने नवी मुंबईवर जलसंकट घोंगावत होते. पालिकेने पाणी कपातीची तयारी सुरू केली होती. नागरीकांना पाणी जपून वाचवण्याचे आवाहन करण्यात येत होते. मटार जुलै महिन्यात पावसाने निराश केले नाही. शहरी भागात व नवी मुंबई ची तहान भागविणार्‍या चौक येथील मोरबे धरण परिसरात चांगला पाऊस पडत आहे. सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत धरण कमी भरले असेल तरी जलसाठा दिलासादायक मानला जात आहे. मात्र सप्टेंबर अखेरपर्यंत पाण्याचे प्रमाण कायम राहणे आवश्यक असून तरच पुढील आठ महिने नवी मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.

टारे व नाले कठोकाठ भरले

नवी मुंबईची भौगोलीक परिस्थिती ही खाडी किनारे, एका बाजूला डोंगर रांगा अशी आहे. तर शहरांतर्गत अनेक भाग हे उंच सखल आहेत. घनकचरा विभागाने पावसाळा पूर्व नालेसफाई व गटारसफाई पूर्ण केली असली तरी मुसळधार पावसाने काही गटारे व नाले कठोकाठ भरून वाहत होते. काही चेंबर्स फुल झाल्याचे पाहायला मिळाले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply