Breaking News

बारवईतील उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्त
उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती सुरूच असून पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील बारवई येथील अनेक कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 30) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी या प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
बारवई येथील झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष प्रवीण खंडागळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती देविदास पाटील, गुळसुंदे जि.प.विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, केळवणे जि.प. विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पोयंजे पं.स. विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकूर, सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील माळी, ज्ञानेश्वर सुर्वे, महादेव कांबळे, तेजस पाटील, रोशन पाटील, सुनील दळवी, सुनील चौहान, मंगेश लबडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी उद्धव ठाकरे गटातून मयूर धावारे, अक्षय बाबरे, रूपेश बाबरे, प्रणय बाबरे, विकी खंडागळे, राहुल बाबरे, आशिष बाबरे, संकेत जाधव, केतन पाटील, विजय बाबरे, भालचंद्र बाबरे, प्रमोद धावरे, संतोष बाबरे, नरेश बाबरे, हनुमंत धावारे, विष्णू पवार यांनी विकासाचे ‘कमळ’ हाती घेतले. या सर्वांचे आमदार महेश बालदी व सहकार्‍यांनी भाजपमध्ये स्वागत केले.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply