Breaking News

अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यार्या आरोपीला एक वर्षाची सक्तमजुरी

अलिबाग : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यार्‍या आरोपीला अलिबागच्या विशेष सत्र न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. योगेश तळेकर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे 3 ऑक्टोबर 2019 रोजी सहा वर्षाची मुलगी वाडीत खेळत होती. यावेळी आरोपी योगेश यशवंत तळेकर तिथे आला. त्याने बळजबरीने तीला उचलून समुद्र किनार्‍यावर नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करू लागला. यावेळी मुलगी जोरजोरात रडायला लागली. हा आवाज ऐकून गावकर्‍यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा आरोपी योगेश मुलीला ढकलून पळून गेला.

या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण करणे, तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणे यासारख्या, तसेच पॉस्को कायद्यातील कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी अलिबाग येथील विशेष सत्र न्यायाधिश एस. एस, शेख यांच्या न्यायालयासमोर झाली. यावेळी सरकारी अभियोक्ता म्हणून अश्विनी बांदिवडेकर पाटील यांनी काम पाहिले. सुनावणी दरम्यान सात जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात पीडित मुलगी, तिचे वडील, तिचे काका आणि तपास अधिकारी यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्या प्रकरणी योगेश तळेकर यास दोषी ठरवले. व एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि दोन हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

Check Also

विकासकामे भाजपच करू शकतो -अरुणशेठ भगत

केळवणे येथे विकासकामांचे भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त शेकापने विकासाच्या कामांना विरोध करण्याचे काम नेहमीच …

Leave a Reply