पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील कोपर येथे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या (जेबीएसपी) रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल तसेच मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालयातील चेअरमन व प्राचार्य केबिन आणि प्रशासकीय कार्यालयाचा उद्घाटन सोहळा सोमवारी (दि.27) झाला.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालयाच्या एकत्रित इमारतीचे बांधकाम कोपर येथे सुरू आहे. यामधील चेअरमन केबिनचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते, प्राचार्य कार्यालयाचे राज अलोनी यांच्या हस्ते आणि प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन सचिव डॉ.एस.टी.गडदे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत,
दर्शन ठाकूर, वसंत पाटील, प्रकाश भगत, संजय भगत, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील पाटील, भाऊशेठ पाटील, मनोहर ओवळेकर, हरिश्चंद्र ठाकूर, अविनाश कुलकर्णी, आदित्य ठाकूर, अपूर्व ठाकूर आदी उपस्थित होते.
Check Also
कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड
जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …