Breaking News

पेणच्या गणेशमूर्तींना मिळाले भौगोलिक मानांकन

अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील पेण येथील जगप्रसिद्ध गणेशमूर्तींना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. चेन्नई येथील जीआय नोंदणी कार्यालयाने हे भौगोलिक मानांकन दिले आहे. यामुळे आता पेण येथील गणेशमूर्तींना वेगळी ओळख मिळेल व गणेशभक्तांची फसवणूक होणार नाही.
ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सीच्या वतीने चेन्नई येथील जीआय नोंदणी कार्यालयाकडे मानांकन मिळविण्यासाठी देशभरातील उत्पादनांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 13 उत्पादने महाराष्ट्रातील आहेत. यात पेण येथील गणेशमूर्तींचा समावेश होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पेण येथील गणेशमूर्तींना भौगोलिक मानांकन मिळाले आहे.
पेण हे गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथील गणेशमूर्ती सुबक, आकर्षक असतात. त्यामुळे येथील गणेशमूर्तींना भारतासह परदेशातदेखील प्रचंड मागणी आहे. पेणमधून दरवर्षी लाखो गणेशमूर्ती परदेशात पाठविल्या जातात. यात कोट्यवधींची उलाढाल होत असते. याचा गैरफायदा घेताला जातो. इतर ठिकाणी बनविलेल्या मूर्तीदेखील पेण येथील असल्याचे सांगून विक्री करून गणेशभक्तांची फसवणूक केली जाते. ही फसवणूक टाळण्यासाठी तसेच पेण येथील गणेशमूर्तींना वेगळी ओळख मिळून देण्यासाठी गणेशमूर्तींना जीआय मानांकन मिळविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तो मंजूर झाला आहे.

पेण येथील गणेमूर्तींना वेगळी ओळख मिळावी यासाठी त्यांचा जीआय मानांकनासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे गणेशभक्तांची फसवणूक होणार नाही.
-गु. श. हरळय्या, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply