Breaking News

भाजपचे शंखनाद अभियान; सोशल मीडिया पदाधिकार्‍यांची पनवेलमध्ये कार्यशाळा, नियुक्तीपत्रांचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त

आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने शंखनाद 2024 अभियान सुरू केले आहे. भाजप यंदाही सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला टक्कर देणार आहे. शंखनाद अभियानांतर्गत पनवेलमध्ये सोशल मीडिया पदाधिकार्‍यांची कार्यशाळा रविवारी (दि.4) सोशल मीडिया सेलचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक प्रकाश गाडे आणि भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाली.
भाजप उत्तर रायगड जिल्हा सोशल मीडिया आणि आयटी सेल यांच्यातर्फे शंखनाद अभियान कार्यशाळा पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, चारुशिला घरत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, महिला मोर्चा सोशल मीडिया प्रदेश सहसंयोजिका बिना गोगरी, सदस्य मोना अडवाणी, जिल्हा संयोजिका अ‍ॅड. गायत्री परांजपे, आयटी सेल जिल्हा संयोजक नितेश सोलंकी, सोशल मीडिया पनवेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, जिल्हा सदस्य राजेंद्र कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी प्रदेश संयोजक प्रकाश गाडे यांनी आगामी निवडणुकांमध्ये सोशल मीडिया सेलवर महत्त्वपूर्ण जबाबदारी असून कशा प्रकारे काम करावे या विषयी मार्गदर्शन केले. आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनीही मार्गदर्शनपर विचार मांडत सरकारची कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा, असे आवाहन केले. या कार्यशाळेत नवनियुक्त पदाधिकार्‍यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply