पनवेल ः रामप्रहर वृत्त
गव्हाण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शिवाजीनगर गावासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अर्थसहाय्यातून जलकुंभ उभारण्यात आले आहे. या जलकुंभाचे उद्घाटन रविवारी (दि.4) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाला शिवाजीनगर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, वामन ठाकूर, तुळशीदास ठाकूर, पंढरीनाथ ठाकूर, गजानन ठाकूर, विजय ठाकूर, श्रीधर ठाकूर, भास्कर पाटील, सुहास ठाकूर, शिवाजी ठाकूर, नारायण ठाकूर, जगदीश ठाकूर, सुनील ठाकूर, सुरेश ठाकूर, रसिकलाल कनाडा, विष्णू कडू, तुकाराम मोकल, एकनाथ ठाकूर, दिलीप ठाकूर, हेमंत ठाकूर, सुरेश ठाकूर, प्रल्हाद ठाकूर, राजेंद्र ठाकूर, रतन ठाकूर, अमित कडू, जितेंद्र कडू, नंदा ठाकूर, कुसुम ठाकूर, शांताबाई ठाकूर, आशा म्हात्रे, मंजुळा कडू, रंजनी ठाकूर, सुचिता ठाकूर, सरस्वती ठाकूर, मालती ठाकूर, विमल कडू, सुरक्षा ठाकूर, साकुरबाई ठाकूर, विठाबाई पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले, मला मनापासून आनंद होत आहे की, माझ्या हातून अजून एक चांगलं काम गावासाठी झालंय. पाणी ही आपली मूलभूत गरज असली तरी त्याचा वापर जपून केला पाहिजे.