Breaking News

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीचे उद्घाटन भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांच्या हस्ते रविवारी (दि.4) झाले. या अकॅडमीसाठी लागेल ती मदत करण्याची ग्वाही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी दिली.
क्रिकेटमध्येही गावातील तरुणांनी पुढे जावे या उद्देशाने उलवे रोड सेक्टर 10 येथे शिवाजीनगर गावाजवळ क्रिकेट अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे. प्रामुख्याने माजी क्रिकेटपटू संजय बांगर, एमसीएचे दीपक मोरकर, मनोज लोखंडे यांचे मार्गदर्शन या अकॅडमीत क्रिकेटपटूंना मिळणार आहे.
अकॅडमीच्या उद्घाटन समारंभाला भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पं.स.च्या माजी सदस्य रत्नप्रभा घरत, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, कोळी समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ कोळी, किशोर पाटील, जयवंत देशमुख, सी.एल. ठाकूर, वामन ठाकूर, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर यांच्यासह आदेश स्पोटर्र्स कमिटीचे सदस्य आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना पागोटे येथे अभिवादन

उरण : रामप्रहर वृत्तउरण तालुक्यात 1984 साली झालेल्या गौरवशाली लढ्यातील हुतात्म्यांना 41व्या स्मृतीदिनी आमदार प्रशांत …

Leave a Reply