Breaking News

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना; रायगड जिल्ह्यात 15 लाख 83 हजार जणांना धान्याचा लाभ

अलिबाग : प्रतिनिधी

कोरोना काळात गरीब, गरजूंना धान्य मिळावे यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना राबविण्यात आली. रायगड जिल्ह्यात आठ महिन्यांत या योजनेतून 62 हजार 64 मेट्रीक टन धान्याचे वाटप करण्यात आले. याचा 15 लाख 83 हजार लाभार्थ्यांना लाभ मिळाला. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदी सुरू झाल्यानंतर गरीब गरजूंची उपासमार होऊ नये यासाठी केंद्र सरकारतर्फे पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत प्रती व्यक्ती पाच किलो धान्य मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या काळात ही योजना देशभरात राबविण्यात आली. या योजनेचा जिल्ह्यातील 15 लाख 83 हजार 122 जणांनी लाभ घेतला. जिल्ह्यात 13 हजार 72 शिधा वाटप केंद्रांमार्फत एकूण 62 हजार 64 मेट्रीक टन झाल्याचे वाटप करण्यात आले.

कोरोना कालावधीत केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. या योजनेंतर्गत आठ महिन्यांत 62 हजार मेट्रीक टन धान्याचे वितरण करण्यात आले आहे. जवळपास 15 लाख लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.

-मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड

Check Also

छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक

शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच होणार सुरुवात पनवेल ः रामप्रहर वृत्तमुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये …

Leave a Reply