भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त
आपले ध्येय्य गाठायचे असेल तर आपली जिद्द ही पक्की पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रमावेळी केले. तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी ही महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या वतीने महिलांसाठी राबविणार्या येणार्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व सर्व महिलांच्या सदैव पाठीशी आहे असे सांगितले.
भाजप माथाडी, ट्रान्सपोर्ट, सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनचे उपाध्यक्ष संजय जनार्दन भगत यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 4) महिला बचत गट आणि तरुणांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित आला होता. या कार्यक्रमावेळी संजय भगत यांचा वाढदिवस केक कापून साजरा झाला. संजय जनार्दन भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
या कार्यक्रमामध्ये रायगड जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक मोहन पालकर यांनी उपस्थित सर्व महिला बचत गटाच्या महिलांना तसेच तरुणांना उद्योग निवड, भांडवल उभारणी, कर्ज योजना, शासनाचे सहकार्य तसेच उद्योग सुरू करताना येणार्या समस्या तसेच त्या सोडवण्यासाठी करण्यात येणार्या उपायोजनांसंदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमावेळी महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून शकुंतला रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये मालती लोखंडे आणि वर्षा गायकवाड या विजयी झाल्या. त्यांना मान्यवरांच्या हस्ते साडी देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच हेल्दी गुळयुक्त शुद्ध गायीच्या तुपामधील विविध प्रकारच्या पौष्टिक लाडू तसेच फराळाचा व्यवसाय करणार्या विद्या मंगेश बागवे आणि भुमी लघू उद्योगासह विविध व्यवसाय करणार्या मनिषा रवींद्र खरात या दोन उद्योजीका महिलांचा विशेष सत्कार या वेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाला शकुंतला रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष जयंत पगडे,सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक राजू सोनी, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, अॅड.वृषाली वाघमारे, नीता माळी, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, अर्चना ठाकूर, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, संजीवनी म्हात्रे, सपना पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे संयोजन भाजपच्या जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, माजी नगरसेविका नीता माळी, रमेश देवरुखकर, आरती तायडे, चंद्रकांत मंजुळे यांनी केले होते.