
पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने मोदी भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात दररोज हजारो गरजू लोकांना जेवण पुरविले जात आहे. तत्पूर्वी थर्मल स्कॅनरने तपासणी करून त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे. त्याकरिता सभागृह नेते परेश ठाकूर विशेष लक्ष देत आहेत.