Breaking News

पक्ष सोडणार नाही : पंकजा मुंडे

परळी : प्रतिनिधी

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांची कन्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी (दि. 12) गोपीनाथ गडावर खास मेळावा आयोजित केला होता. या वेळी बोलताना त्यांनी मी पक्ष सोडणार नाही, याचा पुनरूच्चार करून चर्चांना पूर्णविराम दिला.

या मेळाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, प्रकाश मेहता, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह नेते, पदाधिकारी आणि पंकजा मुंडे यांचे समर्थक उपस्थित होते.

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, मी फेसबुकवर पोस्ट लिहून या मेळाव्यासाठी आवाहन केले. त्याच्या दोन दिवसांनंतर मी पक्ष सोडणार, मी पक्षाविरोधात बंडखोरी करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या, परंतु बेईमानी आमच्या रक्तात नाही. आज या व्यासपीठावरून सांगू इच्छिते की, मी पक्ष सोडणार नाही, पण मला भाजप कोअर कमिटीच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी ते भावूक झाल्याचे दिसून आले.

Check Also

खारघर हिल महापौर मॅरेथॉन प्रोमो रनला उत्तम प्रतिसाद

खारघर ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने रविवारी (दि.19) आयोजित करण्यात आलेल्या खारघर हिल महापौर मॅरेथॉन …

Leave a Reply