पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या माध्यमातून राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण राज्यात नमो चषकचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पनवेल परिसरात कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा, कला व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला असून या अंतर्गत गुरुवारी (दि. 18) कामोठे येथे नमो कुस्ती स्पर्धा रंगली.
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण राज्यात नमो चषक स्पर्धा होत आहे. कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल येथे झालेल्या नमो चषक कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत खेळाडूंना प्रोत्साहित केले.
स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटिल, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, राजा भोईर, बळीराम पाटील, माजी नगरसेवक विकास घरत, युवा नेते हॅप्पी सिंग, युवा मोर्चा कामोठे अध्यक्ष तेजस जाधव, आदित्य भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कुस्तीप्रेमी उपस्थित होते.
Check Also
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper