Breaking News

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन

पनवेल ः वार्ताहर

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातंर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि.10) पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आले. या वेळी त्यांनी महाराष्ट्राला नव्हे; तर संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरेल असे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयांतर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय येनपुरे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी किसन जावळे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी एनआरआय पोलीस ठाणे व तळोजा पोलीस ठाणे येथील पुरावा व्यवस्थापन कक्षाचेदेखील ऑनलाईन प्रणालीद्वारे उद्घाटन झाले.
आगामी काळात अमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पोलीस खाते आता आधुनिकीकरणाकडे वाटचाल करीत असल्याचे नमूद केले.
प्रास्ताविकात नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले की, पोलीस खात्यातील कामाचा वाढता ताण व अपुरे मनुष्यबळ यातून मार्ग काढत नवनवीन संकल्पना राबवून परिमंडळ 1 व 2 या स्तरावर अशा प्रकारचे उपक्रम सुरू करण्यात आले असून यामुळे पोलिसाना मोठा फायदा होत आहे.
या उपक्रमाला सहकार्य करणार्‍या मान्यवरांचा या वेळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर कविता चौतमोल, माजी नगरसेवक हरेश केणी, अजय बहिरा, राजू शर्मा, मुकित काझी, प्रभाकर बहिरा, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, नीता माळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चिटणीस ब्रिजेश पटेल, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply