रसायनी ः रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्यातून विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच निरनिराळ्या योजनांतंर्गत बाबींचे लाभार्थ्यांना वाटप शनिवारी (दि.9) आपटा सारसई बागेचीवाडी येथे करण्यात आले. या सोहळ्यास आमदार महेश बालदी आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या वेळी माडभुवन आदिवासीवाडीचे भूखंड वाटप, सभागृहाचे भूमिपूजन, आदिम घरकुल योजनेंतर्गत गृहप्रवेश, आदिवासी विकास प्रकल्प योजनेंतर्गत मच्छीमार बोटींचे व जाळ्यांचे वाटप, जलजीवन मिशन नळ पाणीपुरवठा योजना भूमिपूजन, बाळूमामा मंदिर कोनशिला पूजन तसेच कातकरी समाजाला प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
या सोहळ्यास माजी जि.प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, केळवणे जि.प. विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, गुळसुंदे जि.प. विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, कर्नाळा विभागीय अध्यक्ष चंद्रकांत पाटील, आपटे पं.स. अध्यक्ष संदीप पाटील, जांभिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच रिया कोंडीलकर, सावळे सरपंच सुनील माळी, आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता पाटील, गिरवलेचे माजी सरपंच आत्माराम हातमोडे, कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किरण माळी, विजय मुरकुटे, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्याधर जोशी, राजू पाटील, साईचे माजी सरपंच विद्याधर मोकल यांच्यासह मनोहर भोईर, ज्ञानेश्वर भोईर, राकेश गायकवाड, गजानन पाटील, अखलाक बडे, भैय्याशेठ, दिनेश पाटील, रवि चितळे, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक
प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …