पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील नागरिकांना भेडसवणार्या समस्या मार्गी लागून विविध सुविधांचा लाभ मिळत आहे. त्यानुसार पाच कोटी 15 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि.16) झाले.
अर्थसंकल्प 2022-23मधील दोन कोटी 50 लाख रुपयांच्या निधीतून विचुंबे नवीन ब्रिज-विसपुते कॉलेज ते शिवकरपर्यंतचा रस्ता आणि दोन कोटी 50 लाख रुपयांच्या निधीतून विचुंबेमधील ज्ञानेश्वरी माऊली सोसायटीमार्गे उसर्लीपर्यंतचा रस्ता तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 15 लाख रुपयांच्या निधीतून माया रेसिडेन्सी ते मानसी पार्कपर्यंत गटाराचे काम करण्यात येणार आहे.
याशिवाय देवेद ग्रामपंचायतीच्या निधीतून ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभीकरण, ग्रामपंचायतीच्या समोरील गार्डनचे सुशोभीकरण, गाढी नदीवर संरक्षण भिंत बांधणे आणि नवीन गणपती घाट बांधण्याच्या कामाचेही भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान, यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पोदीहून विचुंबे मार्गावर बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला तसेच आवश्यक त्या सूचना दिल्या.
विकासकामांच्या शुभारंभ कार्यक्रमास भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, अनुसूचित जाती सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अमित जाधव, माजी पं.स. सदस्य भूपेंद्र पाटील, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, शिवकर ग्रामंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, युवा मोर्चा अध्यक्ष विवेक भोईर, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, उपसरपंच स्वाती पाटील, भाजप नेते अप्पा गायकवाड, अनिल भोर्ईर, बी.डी.पाटील, भरत पाटील, अविनाश गायकवाड, चेतन सुरते, आनंद गोंधळी, विवेक भोईर, के.सी.पाटील, बळीराम पाटील, रवींद्र भोईर, चेतन भिंगारकर, किरण भोइर, राकेश भोईर, भरत पाटील, संजित भिंगारकर, राकेश मोरे, डी.के.भोईर, किरण भोईर, देवद ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद वाघमारे, उपसरपंच विजय वाघमारे, वामन वाघमारे, निलेश वाघमारे, संदीप वाघमारे, कैलास वाघामरे, वासुदेव वाघमारे, संजय वाघमारे, राजू ठोकळ, उमेश वाघमारे, सचिन वाघमारे, उसर्ली ग्रामपंचायतीचे सरपंच अनिता भगत, मुकेश भगत, जितेंद्र भगत, मच्छिंद्र भगत, जयवंत भगत, संजय भगत, प्रमोद पाटील, नरेश भगत, राकेश भोर्ईर, प्रवीण वाघमारे, कनकेश्वर रसाळ यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ, ज्ञानेश्वर माऊली सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …